महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । पावसाळ्यात येणाऱ्या फळांमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. त्यामुळे सर्दी खोकला सारख्या व्हायरल इन्फेक्शनपासून (Viral Infection) बचाव होतो.
# डाळिंबात ऍन्टीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. डाळिंब खाण्याने पचन व्यवस्था सुधारते. पोटाच्या कॅन्सरमध्ये सुज कमी करतं. कर्करोगाच्या पेशी पसरण्यापासून रोखतो.
# उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरवातीला मिळणारं गडद जांभळ्या रंगाची ही फळं शरीरात साखरेची पातळी आणि मधुमेह कमी करण्यासाठी रामबाण औषध आहेत. यात कॅलरी कमी आणि लोह,फॉलेट,पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात.
# लीचीमध्ये व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन बी,पोटॅशियम आणि ऍन्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. लीची आपल्या शरीरातील एन्टीबॉडी आणि इम्युनिटी मजबूत करण्यात मदत करते. फायबर पाचक प्रणाली शुद्ध करण्यात मदत करते आणि व्हिटॅमिन सी सर्दीशी लढतं.
# आलुबुखार बद्धकोष्ठतेत मदत करतं. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतं. याशिवाय आयर्न, व्हिटॅमिन-सी असतं. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. कॅन्सरपासूनही बचाव होतो.
# पीचमध्ये व्हिटॅमिन-ए,बीटाकॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. पीचमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासही मदत होते.