माझा धर्म , माझे महाराज आणि माझे संस्कार मला दुसर्‍या  धर्माचा अपमान करण्याची परवानगी देत नाहीत ; सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे

Spread the love

महाराष्ट्र 24 ; सातारा :- माझा धर्म , माझे महाराज आणि माझे संस्कार मला दुसर्‍या धर्माचा अपमान करण्याची परवानगी देत नाहीत तसेच माझी तत्वे आणि माझे मन मला माझ्या धर्माचा आणि महाराजांचा अपमान करणार्‍याला क्षमा करण्याची परवानगी देत
नाही..! महापुरुष म्हटले की त्यांची जयंती आलीच. आपण महान अशा भारतात राहतो हे आपले थोर थोर भाग्य. त्यामुळे महापुरुषांची जयंती साजरी करणे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे आद्य कर्तव्य आहेच. आपल्या देशामध्ये खूप थोर महापुरुष होऊन गेले परंतु, ते महापुरुष का झाले. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांचा त्याग हा खूप मोठा होता. यामुळे ते कायम आठवणीत राहिले आणि राहतील. जोेपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत त्यांच्या विचारांची ही साठवण कायम आठवणीत राहील. हेच विचार चांगल्या मार्गाकडे नेत असतात. म्हणून आपला इतिहास, भूतकाळ नेहमी वर्तमान काळ सुरळीत चालवण्याचेच काम करत असतो.

अलीकडच्या काळामध्ये आपला समाज आणि आपल्या देशातील तरुण भरकटत चालला आहे, असे मला तरी वाटतेय. परंतु, तसे होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना. कारण तरुण हा विश्वरुपी बुद्धीबळाच्या पटावरील वजीर आहे. आणि तो देशाचा मजबूत पाया मानला जातो. आणि जर हा तरुणच भरकटला तर सबंध देशावर, राष्ट्रावर आणि या प्रत्येक समाजावर त्याचा दुष्पपरिणाम होण्यास सुरुवात होते. मूळ मुद्दा आहे आपण साजरी करत असलेली महापुरुषांची जयंती.  19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करणार. जयंती साजरी करु नये, या मताचा मी नाही. त्या दृष्टिकोणात आम्ही जाणार नाही.
श्रीमंत असे छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे हे आपले साक्षात दैवतच आम्ही मानतो. कारण त्यांच्यामुळेच आपण आणि सर्व सर्व धर्मांना एकत्रित घेऊन पुढे जाणारा राजा म्हणजेच छत्रपती. संबंध जनतेला त्यांच्या चांगल्या विचारांच्या छत्रछायेखाली घेऊन त्यांनी या समाजाला एकत्र ठेवले एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी स्वराज्य निर्माण निर्माण केले. ही त्याची खरच कोणाशी बरोबरी करता येणार नाही. महाराजांनी त्या काळात यंत्रणा निर्माण केल्या त्यामुळेच स्वराज्य साकारले गेले. मग किती ही त्यांची दूरदृष्टी.

त्यामुळे महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपण कायम स्मरणात ठेवायला हवा. केवळ जयंतीच्या निमित्ताने ओंगळवाणे हावभाव करून वेडेवाकडे नृत्य करून जल्लोष साजरा करणे म्हणजे उत्साहाचा उन्माद केल्यासारखे होईल. एक बाब मात्र आवर्जून सांगावीसी वाटते ती म्हणजे हिरण का इतिहास जब तक हिरण नही लिखेंगी तब तक शिकारियोंकी शौर्यगाथा होगी.
आपल्या राजांचा इतिहास आपण जपला पाहिजे कारण आपण छत्रपतींचे मावळे स्वतःला म्हणवून घेतो, तसा पद्धतीचे वर्तणही करायला हवे ना?
मुजरा राजे आपणास. आम्ही कितीही जन्म घेतले तरी तुमचे ऋण आम्ही फेडू शकणार नाही. मला तुमची जयंती करावीशी वाटते. परंतु, ती कशी तिचे स्वरूप आज प्रत्येकाने वेगळे निर्माण केले आहे. आज शिवजयंती होती ती वेगळ्या स्वरुपाने ती तुम्हाला आणि मला कशी होते, हे चांगलेच ठाऊक आहे. परंतु, शिवजयंती करताना आपण आपल्या राजाची दूरदृष्टी विचारात घेऊन तशा पद्धतीची अंमल बजावणी केली पाहिजे. त्यांनी जे पेरले तेच उगवले म्हणून आज आपण आहोत. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो, महाराज नसते तर आपला म्हादूचा महंमद, सीताबाईची सकीरा झाली असती.
छत्रपतींनी कधीच भगवा झेंडा खाली पडून तिला नाही. मी कुठल्या रंगाचा, कुठल्या धर्माचा वेगळा अर्थ काढत नाही. सर्वधर्म मला एक सारखेच आहेत. सर्व धर्मांनी एकच शिकवले, माणूस आणि माणुसकी. चांगली हे सर्व जण सांगतात. त्यामुळे कुठलाही धर्म वेगळा नाही. किंवा उच्च नाही किंवा खालचा नाही सर्व धर्म सारखेच. माणुसकीची शिकवण देतात.
छत्रपतींच्या विचारांना घेऊन दवडलात तरच आपल्या हाती असलेला भगवा दिमाखाने फडकेल. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही झेंडा खाली पडू दिला नाही. आपण छत्रपतींच्या विचारांची त्यांचे वागणे-बोलणे दिसणे फक्त आणि चंद्रकोर दाढी वाढवून आपण छत्रपतींच्या मावळ्यांची बरोबरी करु शकत नाही. आपण त्यांचे विचार त्यावेळी मनात रुजवून ठेवतो आणि ते आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजात पसरवतो.
तेव्हाच खरी शिवजयंती साजरी होईल. आपण वर्षातून एकदा नव्हे, तर रोज शिवजयंती साजरी शकतो.  तेव्हाच आपल्या राजांना वाटेल, आपले स्वराज्य अजूनही आपण घडवलेले आहे ते टिकून अबाधित राहील.
मला मान्य आहे की ही गोष्ट सोपी नाही पण आपण जर तसा विचार केला तर कुठलीही गोष्ट अवघड नसते. उलट ती सोपी होत राहते. मला चांगले माणूस बनायला क्रांतिकारी विचार छत्रपतींचे विचार समाजात रुजवायला आवडेल. आणि तरच शिवजयंती दिमाखात साजरी झाली, असे आपण अभिमानाने नक्की म्हणू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *