आर.टी.ई. प्रवेश अर्ज भरण्यासाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद… नगरसेवक जावेद शेख ह्यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

महाराष्ट्र 24 ,आकुर्डी ; पिंपरी चिंचवड- बालकांचा मोफत शिक्षण अधिकार आर.टी.ई.( 2009) अंतर्गत शासनाच्या 25% आरक्षणात आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांनी सुरु केलेल्या आकुर्डी दत्तवाडी येथील केंद्रावर पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आता पर्यन्त या केंद्रावर पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील 1640 पालकांनी आपल्या बालकाच्या  प्रवेशासाठी नाव नोंदणी केली आहे.

दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षे योग्य नियोजन 10 संगणक , 14 ऑपरेटर,व पालकांसाठी सुसज्ज मंडपासह बैठक व्यवस्था या मुळे दिनांक 14 व 15 फेब्रुवारी रोजी 270 पालकांनी आपले प्रवेश अर्ज भरले, तरी संथ गतीच्या सर्वर मुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नगरसेवक जावेद शेख ह्यांच्या मार्गदशनाखाली ताहीद शेख व तौफिक शेख व इकलास सय्यद यांनी आयोजन केले, तसेच ह्या कार्यास आपुलकी जेष्ठ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनास योगदान दिले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *