सरकार करणार आठ हजार पोलिसांची भरती तसेच कंत्राटी पद्धतीने ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करणार ; गृहमंत्री अनिल देशमुख

Spread the love

महाराष्ट्र २४ ; पुणे – गृृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देशमुख प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयास भेट दिली. ते म्हणाले, राज्यात मागील पाच वर्षात पोलिस भरती झाली नसून आमचे सरकार आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती मार्च २०२० मध्ये राबवण्यात येणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे संभावित भरती करण्यात येणार असून १२ वी पास आणि १८ ते २८ वयोमर्यादा यासाठी राहणार आहे. भरती प्रक्रियेतून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. नंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्त्वावर सामावून घेण्यात येईल. खासगी कंपनी, हॉस्पिटल, सार्वजनिक महामंडळे या ठिकाणी त्यांच्या नेमणुका केल्या जातील.

राज्यात लवकरच पोलिस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. हिंगणघाट येथील फुलराणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ‘दिशा’ कायदा करण्याचा सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस खात्यात पाच दिवस आठवडा करण्याबाबत कॅबिनेट बैठकीत विचार ठेवला जाऊन चर्चा केली जाईल. पोलिस कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराबाबत कोणत्या तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. राज्यातील अखिल भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) बदल्या नियमाप्रमाणे मार्च-एप्रिल महिन्यात करण्यात येतील. नवीन इमारतींना सीसीटीव्ही बंधनकारक : मुंबई मध्ये सध्या १० हजार तर पुण्यात १३०० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. परंतु ही संख्या कमी असून सुरक्षा दृष्टीने सीसीटीव्ही संख्या वाढवणे गरजेचे आहे.त्यामुळे लवकरच सर्व नवीन इमारत बांधणी करताना प्रवेशद्वार आणि बाहेर पडणे जागा याठिकाणी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करणारा कायदा करण्यात येणार आहे. जुन्या इमारतीवर ही सीसीटीव्ही बसवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. या सीसीटीव्हीचे मॉनिटरिंग करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सरकार पाचशे कोटींचे “अँटी ड्रोन’ खरेदी करणार भविष्यात ‘आरडीएक्स’च्या जागी ड्रोन, रासायनिक व जैविक अस्त्रांचा वापर करून शत्रूकडून हल्ले होऊ शकतात. चीनमध्येही कोरोना विषाणू असाच ‘लीक’ झाल्याची चर्चा आहे. अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी पोलिस दल सुसज्ज केले जाणार असून, लवकरच ५०० कोटी रुपयांचे ‘अँटी ड्रोन’ खरेदी केले जाणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले. ‘अमेरिकेच्या ‘९११’ क्रमांकाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम’ उभारली जात आहे. तातडीच्या वेळी ‘११२’ क्रमांकावर फोन लावल्यास दहाव्या मिनिटाला पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिकेची मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *