कोरोनाचा जगभरात ६७ हजार लोकांना संसर्ग; तब्बल १६०० बळी

Spread the love

महाराष्ट्र २४ बीजिंग – चीनमधीलकोरोना या विषाणूचा संसर्ग जगभरातील ६७ हजारपेक्षा अधिक लोकांना झाला आहे. त्यामध्ये भारतातील तीन रुग्णांचाही समावेश आहे. चीनमधीलकोरोनाग्रस्त मृतांची संख्या आता १६०० वर पोहोचली आहे. चीनमधील शुक्रवारी आणखी १४३ कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावल्यामुळे आतापर्यंत बळींची संख्या १६०० झाली आहे.
२६४१ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये करोना संसर्गावरील उपचारांनंतर संपूर्ण बरे झालेल्या ८०९६ रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने पीडित एका ८० वर्षीय चीनी पर्यटक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या विषाणुमुळे होणारा आशियाबाहेरचा हा पहिला मृत्यू आहे.

विविध देशांमध्ये कोरोना विषाणूची रुग्णांची संख्या. चीन – ६६,४९२ जणांना लागण, हाँगकाँग – ५६ जणांना लागण (एकाचा मृत्यू), मकाव – १० रुग्ण, जपान – २६२ रुग्ण (त्यात योकोहामा येथे नांगरलेल्या क्रूझवरील २१८ जणांचा समावेश), सिंगापूर – ६७ रुग्ण, थायलंड – ३४ रुग्ण, दक्षिण कोरिया – २८ रुग्ण, मलेशिया – २१ रुग्ण, तैवान – १८ रुग्ण, व्हिएतनाम – १६ रुग्ण, जर्मनी – १६ रुग्ण, अमेरिका – १५ रुग्ण (एक अमेरिकी नागरिक चीनमध्ये मरण पावला), ऑस्ट्रेलिया – १४ रुग्ण, फ्रान्स – ११ रुग्ण, ब्रिटन – ९ रुग्ण, संयुक्त अरब अमिरतीज – ८ रुग्ण, कॅनडा – ८ रुग्ण, फिलिपिन्स – ३ रुग्ण (त्यातील एकाचा मृत्यू), भारत, इटली प्रत्येकी ३ रुग्ण, रशिया, स्पेन प्रत्येकी २ रुग्ण, बेल्जियम, श्रीलंका, नेपाळ, स्वीडन, कंबोडिया, फिनलंड, इजिप्त प्रत्येकी 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *