‘आरटीई’ प्रवेशासाठी राज्यात अर्ज भरण्यास सुरुवात ; अर्ज भरण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे

Spread the love

महाराष्ट्र २४ ; पुणे-  शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी २०२०-२१च्या शैक्षणिक प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. शाळा नोंदणीला संस्थांचा प्रतिसाद नसल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी शाळांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली. त्यामध्ये राज्यभरातील ९ हजार ३२८ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात १ लाख १५ हजार १९१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

राज्यात सर्वाधिक शाळा नोंदणी व प्रवेश क्षमता पुणे जिल्ह्यात असून, ९७२ शाळांमध्ये १७ हजार ५१ दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यात शनिवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत ६६ हजार ४८४ जणांनी या प्रवेशासाठी नोंदणी केली. पुण्यात १७ हजार ५१ जागा असल्या, तरी चार दिवसांत १५ हजार ३२४ जणांची नोंदणी झाली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, नागपूर, ठाणे या शहरांमध्येही हजारो अर्ज दाखल झाल्याचे संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *