नोकरी विषयक : 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. (JOB Alert recruitment 2021 : 10th and 12th Pass people Golden Opportunity ) रेल्वेत तसेच बँकेत नवीन भरतीच्या जागा खुल्या झाल्या आहेत.

१) रेल्वेत मास्तर पदासाठी भरती
पश्चिम रेल्वेत स्टेशन मास्तर पदासाठी भरती होणार आहे, ३८ जागांसाठी ही भरती होणार आहे, वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत आहे, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर अर्ज करु शकतात, अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करु शकतातय. सिंगल स्टेज कंम्प्युटर आधारीत टेस्ट म्हणजे सीबीटी , एप्टिट्यड टेस्ट आणि गुणवत्तेवर आधारीत उमेदवाराची निवड होईल. wcr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर नोटीफीकेशन पाहून अर्ज करा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै असणार आहे.

२) नॅबकॉनतर्फे 86 जागांसाठी भरती
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच म्हणजचे नाबार्डाची कन्सल्टन्सी सर्विस अर्थात नॅबकॉनतर्फे 86 जागांसाठी भरती होणार आहे. सिनियर लेवल कन्सल्टंट , मिड लेवल कन्सल्टंटच्या काही जागा आणि एन्युमरेटर 63 जागावर पदभरती आहेत. शैक्षणिक पात्रता कृषी आणि संबधित विषयांत पदवीधर पद्वयुत्तर आणि वयाची मर्यादा आहे 24 ते65 वर्षे, तसचं एन्युमरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि वयाची अट 45 वर्षांपर्यंत . महाराष्ट्रातही यातील काही पदं रिक्त आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे 10 जुलै. वेबसाईट आहे nabcons.com , रिक्रुटमेंटवर क्लिककरुन अधिकृत नोटीफिकेशन पाहा.

३) इंडियन नेव्ही अँकडमीत नोकरीची संधी
इंडियन नेव्ही अँकडमीत ,एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये, शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत विशेष अर्ज मागवले आहेत. या अर्जात पदसंख्या ४५ आहे. शैक्षणिक पात्रता , बीई/बीटेक, एमएससी कम्प्युटर/आयटी, एमसीए किंवा एमटेक, आयटी पदवी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरींग, आयटीमध्ये किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, 16 जुलै आहे. याकरता अधिकृत वेबसाईट आहे- joinindiannavy.gov.in

४) इंडियन कोस्ट गार्डमध्ये 400 जागांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये 400 जागांसाठी भरती होणार आहे. यापैकी जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक ब्रँचसाठी नाविक आणि यांत्रिकची 350 पदं आहेत. शैक्षणिक पात्रता आहे भौतिकशास्त्र आणि गणित विषयासहित १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण गरजेचे आहे. तसेच तर काही पदांसाठी इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनअर अशीही पात्रता आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे १६ जुलै. joinindiancoastguard.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्या.

५) भारत डायनॅमिक्स, संरक्षण मंत्रालयांतर्गत येणा-या कंपनीत भरती
भारत डायनॅमिक्स, संरक्षण मंत्रालयांतर्गत येणा-या या कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती आहे. या पदासाठी इंजिनिअर, फायनान्स आणि मॅनेजमेंटच्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील , कम्प्युटर सायन्स,ऑप्टीक्स, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स आणि एचआर अशा स्ट्रीममधील पदवीधारकांसाठी संधी आहे. पात्रता पाहण्यासाठी अधिकृत नोटीफिकेशन पाहा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 जुलै, वयोमर्यादा आहे 28 वर्षे अधिकृत वेबसाईट – bdl-india.in याला भेट द्या.

६) भारतीय लष्करात महिला सैनिकांसाठी भरती
भारतीय लष्करात, मिलट्री पोलिसांत महिला सैनिकांसाठी, जनरल ड्युटी पदांसाठी भरती होणार आहे. महिलांसाठी जनरल ड्युटीची 100 पद आहेत. अटींमध्ये महिला उमेदवार अविवाहित असावी आणि वयोमर्यादा आहे. 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरूणींसाठी भरती उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता आहे 45 टक्क्यांसहीत 10 वी पास. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट या लेखीपरिक्षेव्दारे उमेदवारांची निवड होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै आहे. नोटीफीकेशन वाचून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे- joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या

७) DFCCIL, रेल्वेमंत्रालयाकडून चालवल्या जाणाऱ्या संस्थेत 1हजार 74 जागांसाठी मेगा भरती
डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. म्हणजेच DFCCIL, रेल्वेमंत्रालयाकडून चालवल्या जाणाऱ्या संस्थेत 1हजार 74 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. Junior Manager, एक्झिक्युटीव्ह आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह अशी ही पदं आहेत. विविध ब्रांचमधील इंजिनिअरींग, तसचं ६० टक्के गुणांसहीत १० वी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी आणि MBA, PGDBA,PGDM पदवी धारकांसाठी सरकारी संस्थेत काम करण्याची उत्तम संधी आहे. संपूर्ण भारतात नोकरीचं ठिकाणं कुठेही असू शकते. अर्जदाराचं वय 18 ते 30 वर्ष असावं. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै आहे, अधिकृत वेबसाईट आहे. अधिकृत वेबसाईट आहे- dfccil.com याला भेट द्या.

८) सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडेंटच्या २५ जागांसाठी पदांसाठी भरती
केंद्रीय राखीव दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडेंटच्या २५ जागांसाठी पदांसाठी भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता यासाठी सिविल इंजीनियरिंगमधील बीई अशी आहे. आणि वयोमर्यादा आहे ३५ वर्षे. लेखी परिक्षा ,फीजकल फिटनेसच्या चाचणीनंतर उमेदवाराची चाचणी होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जुलै आहे. नोटीफिकेशन पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे crpf.gov.in . याला भेट द्या.

९) HEC मध्ये ट्रेनी पदासाठी भरती
भारत सरकारची पब्लिक अंडरटेकिंग असलेली, हेवी इंजिनिअरींग कॉर्पोरेशन लिमिटेड (HEC)मध्ये ट्रेनी पदासाठी 206 जागांसाठी भरती होणार आहे, इलेक्ट्रेशियन, फिटर, मशीनिस्ट, वेल्डर, COPA, टेलरिंग अशा या जागा आहेत. काही पदांसाठी आठवी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधला आयटीआय तर काह पदांसाठी १०वी उत्तीर्ण आणि आयटीआय गरजेचा आहे. वयोमर्यादा आहे 40 वर्षे , नोकरीचं ठिकाण रांची,झारखंड आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै, अधिकृत वेबसाईट- hecltd.com ही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *