राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ; पेरलेलं बी-बियाणं, खतं वाया गेलं,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. पेरलेलं बी बियाणं गेलं, खतं वाया गेली… या संकटात पान्हावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे. (Special Report on Crisis of double sowing on Maharashtra farmers)

राज्यात मान्सून दाखल झाला. सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आणि बळीराजा पेरणीच्या कामाला लागला. कुणी उसनवारी करुन, तर कुणी कर्ज काढून तर काहींनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून बियाणं आणलं आणि पेरणीचं सौंग साजरं केले. पण पाऊस गायब झाला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यातील कोकण, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती सर्वच महसूल विभागात कुठे ना कुठे दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.

राज्यात आतापर्यंत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास खरीप लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 56 टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे, त्यापाठोपाठ 47 टक्क्यांच्या वर कापसाची लागवड झाली आहे. पण बऱ्याच भागात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि बऱ्याच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.

राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी

तालुक्याची संख्या – पावसाची टक्केवारी

1 तालुका 0 ते 25 टक्के पाऊस
09 तालुके 20 ते 50 टक्के पाऊस
25 तालुके 50 ते 75 टक्के पाऊस
34 तालुके 75 ते 100 टक्के पाऊस
286 तालुके 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *