महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे.
आज दुपारी नारायण राणे दिल्लीत पोहोचणार आहेत.भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डां , आणि अमित शाह यांच्या सोबत दिल्लीत राणे तसेच अन्य नेत्यांची बैठक होणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता असून चर्चेत असलेल्या सर्वच नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचे समजते आहे.