मोबाईल बँकिंग करताना सावधगिरी बाळगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । UPI – UPI च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फ्रॉड केल्याचं समोर आलं आहे. यूपीआयद्वारे फ्रॉड करणारे एखाद्या व्यक्तीला डेबिट लिंक पाठवतात आणि त्यावर समोरच्या व्यक्तीने क्लिक करुन आपला पीन टाकल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे कट होतात. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी फोनवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

QR कोड – QR अर्थात क्विक रिस्पॉन्स कोडद्वारे फ्रॉड केले जातात. फ्रॉड करणारे मोबाईलवर क्यूआर कोड पाठवतात. समोरच्याने क्यूआर कोड लिंकवर क्लिक केल्यानंतर फ्रॉडस्टर्स क्यूआर कोड स्कॅन करुन खात्यातून पैसे काढून घेतात

नोकरीच्या नावाने फसवणूक – नोकरीच्या नावाने खोट्या जाहिराती दिल्या जातात किंवा एक लिंक दिली जाते आणि त्यावर क्लिक केल्यानंतर नोकरीसंबंधी माहिती मिळेल, असं सांगितलं जातं. जॉब अलर्ट नावाने फी मागितली जाते. त्यामुळे नोकरीच्या नावाने किंवा एखाद्या पोर्टलवर नोकरी देत असल्याचं सांगत पेमेंट करायचं सांगितलं जातं, अशावेळी त्या पोर्टलची संपूर्ण माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे.

बँक फ्रॉड – बँक खात्याच्या चौकशीच्या नावाने फ्रॉड केले जातात. KYC च्या नावाने बँक खात्यात फ्रॉड होतात. त्यामुळे OTP, KYC, आधार नंबर, पॅनकार्ड अशी इतरही खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नये.

ATM कार्ड क्लोनिंग – एटीएम क्लोनिंगद्वारे फ्रॉड करणारे ग्राहकाची संपूर्ण माहिती चोरी करतात आणि डुप्लीकेट कार्ड बनवून खात्यातून पैसे काढतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *