एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना 5 दिवसांची ईडी कोठडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Scam) अटकेत असलेल्या गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता 12 जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *