महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । नागपुरात आज (गुरुवारी) सकाळपासूनच पावसाला सुरुवात (nagpur rain) झाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून नागपूरकरांना दिलासा मिळाला. (raining from thursday morning in nagpur)
विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. अधूनमधून काळेकुट्ट ढग जमते, मात्र दणक्याचा पाऊस पडत नाही. त्यामुळे नागपूरकरांची काहीही निराशा झाली होती. मात्र, आज सकाळपासूनच काळेकुट्ट ढग पसरले होते. त्यानंतर काही भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांची आणि ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
आजपासून येत्या तीन ते चार दिवसात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. तसेच विजांचा कडकडाट आणि जोरदार वाराही असेल.