Gold Silver Price Today: सोने पुन्हा महागले, चांदी 162 रुपयांनी वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीच्या किमतींच्या (Gold Silver Price Today) वाढीचा परिणामही आज स्थानिक बाजारात अर्थात गुरुवारी व्यापार सत्रात दिसून आला. स्थानिक वायदा बाजारामध्ये गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56 रुपयांनी वाढून 47,966 रुपयांवर पोहोचले, कारण सट्टेबाजांनी घटकाच्या मागणीवर ताजी स्थिती निर्माण केलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 56 रुपयांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 47,966 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यात व्यवसायाची उलाढाल 10,063 लॉटची होती. (Gold Silver Price Today: Gold Rises Again, Prices Close To 48000, What Is The Price Of Silver?)

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे सोन्याचे वायदा भाव वाढले. न्यूयॉर्कमध्ये जागतिक पातळीवर सोन्याचे भाव 0.33 टक्क्यांनी वधारून 1,808 डॉलर प्रति औंस झाले.

 

गुरुवारी चांदीचे भाव 162 रुपयांनी वाढून 69,527 रुपये प्रतिकिलो राहिला, कारण मागणीच्या बळावर व्यावसायिकांनी केलेल्या खरेदीमुळे सोने महागले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमतीत 162 रुपये म्हणजेच ते 0.23 टक्क्यांनी वधारले. आता चांदीचा प्रति किलो 69,527 रुपये फ्युचर्स करार व्यवहार 10,862 लॉटमध्ये झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *