गुंतवणूक कमी फायदा जास्त ; पोस्टाची भन्नाट योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । पोस्टाने एक अशी योजना (Post Office Gram Priya Scheme) तयार केली आहे, ज्यात तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतात. तसेच मॅच्युरिटीवर मॅच्युरिटी बेनिफिट्सही मिळण्यासोबतच विमा संरक्षणही मिळते. ही योजना जवळपास दहा वर्षांसाठी उपलब्ध आहे. यात तुम्हाला नॉमिनेशनची सुविधाही मिळते. तसेच जर विमाधारकाला काही झाले तर नॉमिनीला त्याचा लाभ मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे ग्राम प्रिया (Post Office Gram Priya Scheme). या योजनेत प्रवेश घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. यासाठी किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये आहे.सर्व्हायव्हल बेनिफिट अर्थात पॉलिसीधारकाच्या जिवंत असेपर्यंत चौथ्या वर्षी 20 टक्के, सातव्या वर्षी 20 टक्के आणि दहाव्या वर्षी उर्वरित 60 टक्के रक्कम मिळते. हा बोनस दरवर्षी पोस्ट ऑफिसद्वारे जाहीर केला जातो. अशा परिस्थितीत पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर बोनसचा लाभ सम अ‍ॅश्युअर्डच्या आधारेही मिळू शकतो.

या योजनेच्या लाभ आणि प्रीमियम हे वयानुसार वेगवेगळे आहे. जर एखादा पॉलिसीधारक 25 वर्षांचा असेल आणि त्याने 5 लाखांचा विमा रक्कम खरेदी केला तर त्याला एकूण 7.25 लाख रुपये मिळतील. म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षी ही पॉलिसी खरेदी केल्यास त्याच्या मॅच्युरिटी ही 35 वर्षांपर्यंत असेल. यात 5 लाखांच्या विम्यासाठी मासिक प्रीमियम हा 5042 रुपये इतका असेल. त्यानुसार दररोज 168 रुपये जमा करावे लागतील. तर तिमाही आधारावर प्रीमियम भरण्यासाठी 15126 रुपये भरावे लागतील. तसेच सहामाही आधारावर 30096 आणि वार्षिक प्रीमियम 59670 रुपये असेल.

या योजनेच्या मते, जर तुम्ही ही योजना यंदा म्हणजे 2021 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर चौथ्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये विमाराशीच्या 20 टक्के म्हणजे 1 लाख रुपये उपलब्ध असतील. तर सातव्या वर्षी म्हणजेच 2028 मध्ये तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. तसेच 2031 मध्ये म्हणजेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर सम अॅश्युअर्डच्या 60 टक्के म्हणजेच 3 लाख रुपये उपलब्ध असतील. त्याशिवाय यात बोनसचा लाभही मिळेल.

सध्या टपाल कार्यालयाच्या वतीने या योजनेचा बोनस प्रति हमी विमाराशी 45 रुपये आहे म्हणजेच विमा उतरवलेल्या 1 लाख रकमेचा वार्षिक बोनस 4500 रुपये इतका असेल. तर 5 लाखांसाठी ही रक्कम 22500 रुपये असेल. तसेच येत्या दहा वर्षात बोनसची एकूण रक्कम 225000 रुपये असेल.यानुसार, जेव्हा 2031 मध्ये पॉलिसी मॅच्युर होईल तेव्हा तुम्हाला एकूण रकमेपैकी 60 टक्के आणि 2.25 लाख रुपये बोनस म्हणून मिळतील. यानुसार पॉलिसीधारकाच्याहाती एकूण 7.25 लाख रुपये येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *