पुण्यात या महिन्या पर्यंत मेट्रो धावण्याची शक्यता ; ७० टक्के पूर्ण, महामेट्रोची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । पुणेकरांना (Pune) आता लवकरच मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. गुरुवारी रात्री पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. (Pune metro trial run) मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. दोन महिन्यात वनाज ते गरवारे महाविद्यालया दरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो उपलब्ध व्हावी, यासाठी महामेट्रोनं आपल्या कामाची गती वाढवली आहे.

महामेट्रोनं एप्रिल महिन्याच्या शेवटी वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी प्रत्येकी 3 डब्यांच्या दोन रेल्वेगाड्या नागपूरहून पुण्यात आणल्या. रेल्वेगाड्यांचे डबे वनाज इथल्या मेट्रोच्या यार्डातचं उतरवण्यात आले. त्यांची जुळणी ट्रॅकवर करण्यात आली. त्यानंतर ट्रायलसाठी गुरुवार निश्चित केला आणि चाचणी घेण्यात आली.

सप्टेंबरपर्यंत कामं पूर्ण होणार?

सध्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, एसएनडीटी आणि गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू आहे. आता पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी वनाज, आयडियल कॉलनी आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोनं लक्ष केंद्रित केलं आहे. 60- 70 टक्के या स्थानकांची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. फरशी बसवणं, सरकते जिने उभारणे, लिफ्ट बसविणे, अंतर्गत सजावट आणि फर्निचर, प्लॅटफॉर्म उभारणे ही कामे सुरू असून येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सोनवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *