पाकीटबंद पदार्थांवर इशारा देण्याऐवजी स्टार रेटिंग स्वीकारण्याची तयारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) पाकीटबंद खाद्यपदार्थांवर “इशाराऐवजी हेल्थ स्टार रेटिंग (एचएसआर) स्वीकारण्याच्या तयारीत आहे. सध्या दोनच देशांमध्ये राबवलेली ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. संशोधनात दिसून आले की, स्टार रेटिंगमुळे लोक घातक पदार्थ खाण्याबाबत सतर्क होत नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असे केल्याने फक्त कंपन्यांच्या बचावाचा मार्ग काढला जात आहे. उत्पादनात मीठ, साखर किंवा फॅटचे प्रमाण निकषापेक्षा जास्त आहे हे स्टार रेटिंगने लक्षात येणार नाही. एफएसएसएआयच्या एका अधिकाऱ्याने २५ जूनला झालेल्या ग्राहक संघटनांच्या बैठकीत एचएसआर हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. ग्राहक संघटनांनी नकार दिला. ३० जूनच्या बैठकीत एफएसएसएआयने फ्रंट ऑफ पॅक लेबलच्या निवडीसाठी आयआयएमसारख्या संस्थांकडून सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला.

डब्ल्यूएचओने पदार्थात साखर, फॅट, आयोडीनसारख्या घटकांचे प्रमाण पाकिटावर लिहिण्याचे सांगितले आहे. मेक्सिको, चिलीसह दहापेक्षा जास्त देशांनी ते सक्तीने तर ३० पेक्षा जास्त देशांनी स्वैच्छिक लागू केले आहे. बहुतांशींनी “हाय’ लेबल किंवा “ट्रॅफिक लाइट’ स्वीकारले आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये स्टार रेटिंग लागू आहे. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या संशोधनात आढळले की, “हाय’ इशाऱ्याचे लेबल लावल्याने जास्त कॅलरी, साखर, मिठाच्या उत्पादनांची विक्री घटली आहे. एफएसएसएआयच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य जॉर्ज चेरियन सांगतात, जी वस्तू तो घेत आहे त्यात कोणाचे किती प्रमाण आहे हे ग्राहकाला समजावे म्हणून वॉर्निंग लेबल गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *