झिका विषाणूने वाढवली देशाची चिंता; केरळमध्ये हाय अलर्ट जारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे खतरनाक झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती दिली की, याआधी राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15वर पोहचला आहे.

आरोग्यमंत्री वीणा यांनी म्हटले की, झिका विषाणूच्या लक्षणे आणि परिणामांवर आम्ही काटेकोर लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका विषाणू पसरण्यापासून थांबवण्यासाठी ऍक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

केरळमध्ये झिका विषाणूची पहिली लागण होणारी व्यक्ती गर्भवती महिला होती. महिला आणि तिचे बाळ बरे होत आहेत. झिका विषाणूचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारची टीम राज्यात येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. परंतु या विषाणूबाबत भीती निर्माण होण्यासारखे काही नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *