विद्यार्थ्याने बनवली सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल ; स्वस्तात मस्त! दीड रुपयात 50 किलोमीटर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । प्रदूषणमुक्त आणि स्वस्तात मस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाडय़ांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची हीच गरज ओळखून तामिळनाडूच्या मदुराई येथील धनुष कुमार नावाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्याने चक्क सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल तयार केली आहे. या सायकलवरून अवघ्या दीड रुपयात 50 कि.मी. अंतर कापता येते, असा दावा धनुषने केला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपार गेल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. प्रकासावर जास्त पैसे खर्च होत असल्याने अनेक जण आता इलेक्ट्रिक गाडय़ांचा पर्याय निवडतायत. धनुष कुमारने ई-सायकलसाठी 12 व्होल्टच्या 4 बॅटऱया, 350 वॅटची ब्रुश मोटर तसेच वेग कमी-जास्त करण्यासाठी एक्सिलेटर बसवले आहेत. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 20 वॅटचे 2 सोलार पॅनेल बसवले आहेत.

प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चात प्रवासासाठी ई-सायकल उत्तम पर्याय आहे. मी तयार केलेली ई-सायकल ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने धावू शकते. शहरात फिरण्यासाठी एकढा वेग पुरेसा आहे.
– धनुष कुमार, विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *