आयकर विभागात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती, कसा कराल अर्ज? जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयकर विभागानं १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर नोकर भरती काढली आहे. याअंतर्गत एकूण १५५ जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. आयकर विभागाच्या मुंबईतील कार्यालयात उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. (Sarkari Naukri 2021 in Income Tax Department Mumbai for Meritorious Sportspersons)

आयकर विभागाकडून विविध पदांसाठी नोकर भरतीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यात स्पोर्ट्स विभागातून ही भरती केली जाणार असल्याचं नमूद करण्यात आल्यानं उमेदवारांची फिजिकल एलिजिबिलीटी टेस्ट (PET) केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आयकर विभागाच्या incometaxmumbai.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल. यात अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो भरून पाठवावा लागणार आहे.

कसा कराल अर्ज?
1. आयकर विभागातील नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी विभागाच्या incometaxmumbai.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२. वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या Recruitment सेक्शनवर क्लिक करा

३. आता Sports Quota Recruitment for Meritorious Sportspersons 2021 वर क्लिक करा

४. यात Application for Meritorious Sportspersons in Income Tax Department, Mumbai या लिंकवर क्लिक करा.

५. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

६. त्यानंतर अर्ज दाखल केल्याची खातरजमा म्हणून दिल्या जाणाऱ्या अर्जाच्या प्रतिची प्रिंट काढून घ्या.

कोणत्या पदांसाठी भरती?

टॅक्स असिस्टंट (Tax Assistant)- ८३ जागा

मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – ६४ जागा

इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (Inspector Of Income Tax)- ८ जागा

पात्रता काय?
टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. तर मल्टी टास्क विभागातील पदासाठी उमेदवाराचं कमीत कमी इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. यात इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेवर आधारितच उमेदवाराची निवड केली जाईल. याशिवाय या दोन्ही पदांवर अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारानं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असणं देखील बंधनकारक आहे.

वयाची अट काय?
आयकर विभागानं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराचं वय हे १८ ते ३० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. तर यात कमाल वयात ओबीसी, एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *