मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पहिला रिंगण सोहळा संपन्न ; नियम पाळत , पंरपराही जपली,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे.नुकतेच देहू मधील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज पहिले गोल रिंगण पार पडले. टाळ मृदुंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मात्र तरीही या सोहळ्याच्या रिती-परंपरा यामध्ये कुठला खंड पडू नये म्हणून यासाठी देहूमधील देऊळवाडा परिसरात हे रिंगण सोहळा पार पडले.दरवर्षी परंपरेनुसार हे रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवडी गावमध्ये पार पडते. त्याच पद्धतीने देहूमध्ये हे गोल रिंगण पार पडले.त्यामध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थान कडून हे पहिले गोल रिंगण प्रतिकात्मक स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला,यावेळी वारकऱ्यांनी आणि अश्व यांज संत तुकाराम महाराजांच्या पालखीला रिंगण केले होते.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारीसाठी वारकऱ्यांना अनेक निर्बंध घातले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *