महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या सोन्या-चांदीच्या भावाने आज उसंत घेतली आहे. रविवारी मार्केट बंद होताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीसाठी 69,300 रुपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याच्या दरात 9 जुलैला 170 रुपयांची घसरण झाली होती. त्याच्या आधी सलग आठ दिवस सोन्याच्या दरात अगदीच किरकोळ का असेना वाढ होत होती. आज सोन्याचे दर स्थिर आहेत. चांदीच्या दराचा विचार करता 7 जुलैला 600 रुपये, 8 जुलैला 1000 रुपये आणि 9 जुलैला 200 रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या घसरणीनंतर 11 जुलैला पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.