“विज समस्या सोडवण्यासाठी आमदारांची मॅरेथॉन बैठक

Spread the love

Loading

 शाहूनगर संभाजीनगर कस्तुरी मार्केट परिसरातील नागरिकांच्या विजेच्या समस्या आमदार बनसोडे यांनी जाणून घेऊन तात्काळ सोडवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । पिंपरी चिंचवड , प्रभाग क्रमांक १० मधील गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्यांचा सामना करत आहेत , त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी स्वतः जाऊन नागरिकांची भेट घेतली व त्याच्या विविध समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या .

सोमवारी सकाळी आमदार बनसोडे यांनी नगरसेविका मंगलाताई कदम यांच्या जनसपंर्क कार्यालयावर जाऊन नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या प्रभागातील तक्रारी जाणून घेतल्या या वेळी उपस्थित नागरिकांनी आमदारांसमोर समस्यांचा पाढा च वाचला. कुठे सोसायट्या मध्ये पावसाचे पाणी साचते तर कुठे पेविंग ब्लॉक निघालेत , कुठे ड्रेनेज लाईनचे काम करताना रस्ते खोदलेत लोकांना येण्याजाण्यासाठी त्रास होत आहे , तर कुठे पावसाचे पाणी सोसायटी मध्ये येऊन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात जाते , यासोबत महावितरणा बाबत देखील अनेक तक्रारी करण्यात आल्या त्यात फिडर ला अडथळा आणणाऱ्या फांद्यां, वीज वाहणाऱ्या तारांचा झोल कमी करणे फिडर पिलर मधील खराब झालेले पार्ट्स व दरवाजे बदलणे , दुरुस्ती कामामुळे वारंवार वीज खंडित होत असते , त्यामुळे घरातील उपकरणे निकामी होतात यासाठी आठवड्यात दर गुरुवारी वीज दुरुस्ती ची कामे करण्यात यावी, थकीत वीज बिलांचे सुलभ हप्ते करून देणे , तसेच वीज कनेक्शन कट करण्यापूर्वी वीज ग्राहकांना किमान २ दिवस आधी कल्पना देणे ,तसेच खंडित वीज पुरवठा बाबत तक्रारी मध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे व तक्रार करून २ दिवस त्याची तक्रारिची दखल घेतली जात नाही, अश्या अनेक समस्या आमदारांपुढे मांडल्या .

आमदार बनसोडे यांनी वैयक्तिक प्रत्येकाची तक्रार जाणून घेत संबधित अधिकार्यांना यासंदर्भात तातडीने कारवाई करून भागात वारंवार निर्माण होत असलेल्या विजेच्या समस्या सोडवाव्यात असे सांगितले . तसेच हाउसिंग सोसायटीच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *