आता मोठ्या पहायला मिळणार क्रिकेटमधील ‘दादागिरी’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वात दादागिरी करायला सुरुवात केली. आता तब्बल २५० कोटी रुपये खर्च करून गांगुलीच्या आयुष्यावर एक बॉलीवूड चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटात काम कोणते बॉलीवूड स्टार करणार आहेत, हेदेखील आता स्पष्ट झाले आहे.

बॉलीवूडमध्ये यापूर्वी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा चित्रपट येऊन गेला आहे. भारताला दोनवेळा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरही चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये सुशांतसिंग राजपूतने महत्वाची भूमिका साकारली होती. आता गांगुलीच्या चित्रपटामध्ये त्याची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूर या चित्रपटात गांगुलीची भूमिका साकारणार असल्याचे संकेत मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *