केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी, महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । वाढती महागाई आणि कोरोना महामारीच्या काळात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱयांना मोठी भेट दिली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱयांना मिळणारा महागाई भत्ता (डीए) 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने आज मान्यता दिली.

केंद्र सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए आणि पेन्शनर्सना डीआर देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱया पगारात महागाई भत्ता आणि डीआर दिला जाईल. सरकार केंद्रीय कर्मचाऱयांना व निवृत्तीवेतनधारकांना तीन हप्तेत्यांचे डीए आणि डीआर देईल.
हे तीन हप्ते जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 मधील असतील. तर जुलै आणि ऑगस्ट 2021 साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱयांना दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *