Coronavirus: “ …………… देशासाठी ही गंभीर बाब ”; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । देशात कोरोनाचा कहर अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना आखत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत, ती देशासाठीही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. (pm modi expresses concern about increase corona patient in maharashtra and kerala)

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होते. देशातील ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमतील आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. हे चिंताजनक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून हवा, असे नमूद करत, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. रुग्णवाढ होते, तसे हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तेथील परिस्थिती प्रथम नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काळजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link