Petrol Diesel Price : सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले , मोठी दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । वाढती महागाई सामान्यांसाठी मोठं संकट बनत चाललं आहे. किचनचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. आज तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलचे दर मात्र आज स्थिर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत आज झपाट्याने वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैसे प्रति लीटर वाढ केली आहे. यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रती लीटर वाढलं असून आताचा दर 101.84 रुपये आहे. तर डिझेलचा दर 97.45 रपये आहे.

मुंबईत रोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत. आज पेट्रोलचा दार 107 रुपये 87 पैसे आहे कालच्या भावाच्या तुलनेनं सुमारे 30 पैश्यांची वाढ झाली आहे . त्यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे . लोकल रेल्वे सामान्य माणसांना बँड आहेत त्यामुळे कामावर जाण्यासाठी रस्तेवाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे आणि त्यात रोजच वाढणारे पेट्रोल चे दार त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत 9 वेळा पेट्रोलचे दर वाढले आहेत. डिझेल 5 वेळा महागलं असून एक वेळा स्वस्त झालं आहे. या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल डिझेलचे तब्बल 16 वेळा वाढले आहे. 4 मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत पेट्रोल 11.44 रुपये तर डिझेल 09.14 रुपयांनी वाढलं आहे.

चार मोठ्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचा दर (Petrol-Diesel Price on 17 July 2021)
दिल्ली – पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रतिलिटर

राज्यातील प्रमुख शहरातील दर
पुणे – पेट्रोल १०७.१० रुपये आणि डिझेल ९५.५४ रुपये प्रतिलिटर
नागपूर – पेट्रोल १०७.२० रुपये आणि डिझेल ९५.७६ रुपये प्रतिलिटर
नाशिक – पेट्रोल १०७.५० रुपये आणि डिझेल ९६.२३ रुपये प्रतिलिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *