PPO: पेन्शनर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नंबर, माहित नसल्यास अडकतील तुमचे पैसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । एम्प्लॉई पेन्शन स्कीमच्या (Employee Pension Scheme) अंतर्गत येणाऱ्या पेन्शनर्सना (Pensioners) रिटायरमेंटनंतर (Retirement) पेन्शन मिळते. पेन्शनर्सना एक युनिक नंबर (Unique Number) दिला जातो. या नंबरचा वापर करून पेन्शन मिळवता येते. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) म्हणतात. कोणत्याही कंपनीतून रिटायर (Retired) झाल्यानंतर व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) PPO क्रमांक दिला जातो. रिटायरमेंटनंतर EPFO कर्मचार्‍याला एक पत्र देण्यात येते. या पत्रामध्ये PPO चा तपशील असतो. एखाद्या व्यक्तीकडून जर PPO नंबर हरवला तर त्याला सहजपणे आपल्या बँक अकाऊंटच्या मदतीने तो परत प्राप्त करता येतो. त्यासाठी असणारी प्रक्रिया आपण जाणून घेऊया.

जर एखाद्या व्यक्तीकडून PPO नंबर हरवला तर तो आपल्या बँक अकाऊंट नंबर किंवा PF नंबरच्या सहाय्याने पुन्हा सहजपणे तो नंबर मिळवू शकतो. हा नंबर मिळवण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

जाणून घ्या प्रक्रिया

– सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php ला भेट द्या.

– डाव्या बाजूला दिलेल्या ‘ऑनलाईन सर्व्हिसेस’ विभागात ‘Pensioners Portal’ या पर्यायावर क्लिक करा.

– क्लिक केल्यानंतर नवीन पेज (Page) उघडेल. या पेजवर डाव्या बाजूला असणाऱ्या ‘Know Your PPO No.’ वर क्लिक करावे.

– या ठिकाणी आपला पेन्शन फंडाशी (Pension Fund) लिंक असलेला बँक अकाउंट नंबर टाकावा लागेल किंवा आपला PF नंबर त्यालाच मेंबर आयडी (Member ID) म्हणतात तो टाकून सुद्धा सर्च करू शकता.

– तपशील यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर PPF नंबर स्क्रीनवर दिसेल.

 

अशाप्रकारे मिळेल PPO नंबर

त्याशिवाय नवीन टॅबमध्ये https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ही लिंक उघडून सुद्धा आपण PPO नंबर मिळवू शकता. PPO नंबरशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी EPFO ची स्वतंत्र वेबसाइट आहे. या ठिकाणी आपण हयातीचा दाखला, PPO नंबर, पेमेंट (Payment) संबंधित माहिती आणि आपल्या पेन्शनच्या स्थितीबद्दल (Pension Status) सुद्धा माहिती घेऊ शकता.

 

आपल्या पासबुकमध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर असेल याची खात्री करून घ्यावी. बऱ्याचदा बँक कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या पासबुकमध्ये PPO नंबर टाकत नाहीत. त्यामुळे पेन्शन अकाउंट एका ब्रँचमधून दुसर्‍या ब्रँचमध्ये ट्रान्सफर (Transfer) केल्यानंतर पासबुकमध्ये PPO नंबर नसेल तर अडचणी येऊ शकतात. यामुळे पेन्शन मिळण्यास सुद्धा उशीर होऊ शकतो. याशिवाय पेन्शन संबंधित कोणतीही तक्रार EPFO कडे करण्यासाठी आपल्याकडे PPO नंबर असणं आवश्यक आहे. तसेच पेन्शनची स्थिती ऑनलाईन जाणून घेण्यासाठी सुद्धा PPO नंबर आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *