अकरावीची सीईटी 21 ऑगस्टपर्यंत ; उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आणि नियमावली दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षेविषयीची माहिती दिली असून सोमवार 19 जुलैपासून सीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 21 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा पार पडण्याची शक्यता आहे.

सीईटीसंदर्भातील नियमावली आणि वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सीईटीचा जीआर जारी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे दहावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना सरसकटपणे उत्तीर्ण केल्यामुळे राज्यात प्रचंड मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना गुणदेखील भरघोस मिळाले आहेत.

मुंबईसह पुणे, संभाजीनगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी शहरांमध्ये असलेल्या नामवंत महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच होणार असून त्या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही अकरावीचे प्रवेश घेता येणार आहेत. मात्र ज्या ठिकाणी महाविद्यालयांची संख्या कमी असेल आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना सीईटीला सामोरे जावे लागणार आहे.

 

‘सीईटी’ अशी असेल…
 19 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू.
 शिक्षण मंडळाच्या वेबसाइटद्वारे ‘सीईटी’साठी स्वतंत्र पोर्टल.
 21 ऑगस्टपर्यंत परीक्षा
 सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम
 सीईटीचे बंधन नाही
 सीईटी न देणाऱया विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱया टप्प्यात
 सीईटी ऑफलाइन पद्धतीने होणार
 अकरावी प्रवेशांसाठी होणारी सीईटी ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यासाठी इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र्ा या विषयांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक विषयाला 25 गुणांचे वेटेज देण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विषयातील काही प्रकरणे एकत्र करून, अभ्यासक्रम निश्चिती केला जाईल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने उत्तरे द्यावी लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *