जर तुम्ही अतिरिक्त इनकमच्या शोधात असाल तर हा पर्याय पहा ; महिन्याला होईल 80000 कमाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । लॉक डाउन , कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशात जर तुम्ही अतिरिक्त इनकमच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. इंडियन रेल्वे अँड कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC सह जोडून कमाई करता येऊ शकते. IRCTC एजेंट बनून चांगली रक्कम मिळवू शकता. भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी IRCTC ला रेल्वे तिकीट बनवण्यासाठी एजेंटची गरज असते. इथे रेल्वे ट्रॅव्हल सर्विस एजेंट (Railway Travel Service Agent) असं पद असेल.

IRCTC –

भारतीय रेल्वे जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. IRCTC ऑनलाईन तिकीट बुकिंग/ रद्द करण्याचीही सुविधा देते. बुक केलेल्या एकूण आरक्षित तिकीटांपैकी 55 टक्के तिकीटं ऑनलाईन बुक केली जातात. IRCTC कडे अधिकृत तिकीट बुकिंग एजेंट आहे, जे अमर्यादित ई-तिकीट बुक करू शकतात.

कशी होते कमाई?

RTSA स्कीम मूळ रुपात 1985 मध्ये लागू झाली होती. यात एजेंटला तिकीट बुक करण्याच्या बदल्यात कमीशन मिळतं. एखादा एजेंटने युजर्स लॉगइन केल्यानंतर, IRCTC अ‍ॅप्लिकेशन डिजीटल प्रमाणपत्र प्रमाणित करेल आणि प्रमाणित असल्यास, बुक केल्या जाणाऱ्या तिकीटांच्या संख्येवर कोणताही प्रतिबंध लागू न होता, केवळ ई-तिकीट बुक करण्याची परवानगी देईल. IRCTC एजेंटला विना एसी क्लाससाठी (Non- AC Class) 20 रुपये प्रति PNR आणि एसी क्लाससाठी (AC Class) 40 रुपये प्रति PNR कमीशन मिळतं. त्याशिवाय 2000 रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारावर 1 टक्काही मिळतो.

80000 पर्यंत होऊ शकते कमाई –

एका महिन्यात एजेंट किती तिकीट बुक करू शकतात, याची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे कोणीही महिन्याला अमर्यादित संख्येत तिकीट बुक करू शकतात. एजेंटला प्रत्येक बुकिंग आणि व्यवहारावर कमीशन मिळतं. एक एजेंट महिन्याला 80000 पर्यंत रेग्युलर इनकम मिळवू शकतो. काम कमी झाल्यासही 40-50 हजार रुपयांची कमाई करता येऊ शकते.

IRCTC एजेंट बनण्यासाठी 12वी पास होणं गरजेचं आहे. एजेंटसाठी अर्ज करताना सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. इथे फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो, अ‍ॅड्रेस प्रुफ, डिक्लेरेशन फॉर्म अशा कागदपत्रांची गरज असते.

एजेंट बनण्यासाठी बुकिंग एजेन्सीकडे दोन प्लॅन आहेत. पहिल्या प्लॅनमध्ये एका वर्षाच्या एजेन्सीचा चार्ज 3999 रुपये आहे. दुसऱ्या प्लॅनमध्ये दोन वर्षांच्या एजेन्सीचा चार्ज 6999 रुपये आहे. IRCTC एजेंट बनण्यासाठी आधी डिमांड ड्राफ्ट DD बनवावा लागेल. हा DD 30000 रुपयांचा IRCTC च्या नावे बनवावा लागेल. ही डील कॅन्सल केल्यास, 20000 रुपये परत केले जातील. तसंच दरवर्षी 5000 रुपये अ‍ॅग्रिमेंट रिन्यूअलसाठीही भरावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *