पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान संबोधणार, साऱ्या देशाचे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेच्या पावसाळी (Monsoon Session) अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी सभागृहात देशाच्या कोविड परिस्थितीवर भाष्य करतील. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) ज्यांनी आपला जीव गमावला त्याबद्दल पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, बहुतेक खासदारांचं लसीकरण झालं आहे. यामुळे संसदेचं काम अधिक आत्मविश्वासाने पार पाडण्यास मदत होईल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले की, पंतप्रधान मोदी 20 जुलै रोजी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील आणि कोरोना महामारीबद्दल चर्चा करतील.

पहिला दिवस गदारोळात
सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. त्यानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज 20 जुलै 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

संसदेचं हे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सत्रादरम्यान सरकार (Central Government) अनेक विधेयकं पारीत करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Second Wave of Coronavirus) जाणवलेला आरोग्य सुविधांचा अभाव आणि पेट्रोल तसंच डिझेलच्या वाढत्या किंमती (Hike in Petrol and Diesel Price) या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *