Honda CB650R बाइक झाली भारतात लाँच, ; पहा फीचर्स आणि किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । होंडाने भारतात आपली नियो-स्पोर्ट्स कॅफे इन्स्पायर्ड बाइक Honda CB650R बाईक लॉन्च केली. 648 cc इंजिन क्षमतेची ही तुफान बाइक आहे.कंपनी ही बाइक आपल्या बिगविन प्लॅटफॉर्मवरुन विकत आहे. होंडाने CB650R बाईक मॅट गन पावडर ब्लॅक मेटलिक आणि कँडी क्रोमोस्फियर रेड या दोन रंगात लाँच केली आहे.ही बाईक 649 CC 16 व्हॉल्व्ह DOHC तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन 12.5 Rpm वर 64 KW ची उर्जा आणि 8,500 Rpm वर 57.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं.कंपनीने या बाईकमध्ये अनेक हायटेक फीचर्स दिली आहेत. जी या बाईकला खास बनवते. होंडाने बाइकमध्ये असिस्ट / स्लीपर क्लच प्रदान केला आहे ज्यामुळे बाइक चालवणे अजून सोपे होते.

आपल्याला CB650R मध्ये होंडा अँटी थेफ्ट डिव्हाइस देखील मिळेल. या बाईकची एक्स शोरूम किंमत 8 लाख 67 हजार रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *