पुण्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । पुण्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील 48 तासात काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय.

गेली दोन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ वातावरण होतं. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. आज दुपारनंतर शहरात मध्यम पावसाला सुरुवात झालीये. याच मध्यम स्वरुपाच्या पावसाचं रुपांतर मुसळधार पावसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय.

पुण्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टाचा इशारा
मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे कोलहापुरच्या घाट क्षेत्रातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्याच्या धरणक्षेत्रांत संततधार, पाणीसाठी वाढला
पुणे जिल्ह्याच्या चारही धरण क्षेत्रात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. खडकवासला धरण साखळीत मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा या 24 तासात सुमारे सव्वा टीएमसी पाणी वाढलं.

मंगळवारी सकाळी 6 बुधवारी सकाळी 6 अशा 24 तासात खडकवासला धरण परिसरात 15 मिलिमीटर, पानशेतमध्ये 126, वरसगावला 114 तर टेमघरमध्ये 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या चारही धरणांमध्ये 12. 25 टीएमसी म्हणजेच 41.2 99 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

दरम्यान, पानशेत धरणातून 560 क्‍युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जाते त्या खडकवासला धरणातून कालव्यात 1054 क्‍युसेक पाणी खरीप हंगामासाठी सोडले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *