महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । खडकवासला धरण 88% भरले आहे. आता मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 2466 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे धरण भरण्याची शक्यता असल्याचे सांगत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेकडून देण्यात आला होता. ‘खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी.’ असे ट्विट पुणे महापालिकेकडून करण्यात आले होते.
खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी. #PMCPuneUpdate#PMC#पुणे_महानगरपालिका pic.twitter.com/D4MmQcnaB9
— PMC Care (@PMCPune) July 22, 2021