मावळ तालुक्यात मागील २४ तासांत विक्रमी २०६.५७ मिली पावसाची नोंद

Spread the love

महाराष्ट्र 24 । कामशेत ।
गणेश क्षिरसागर ।

दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात २४ तासांत २०६.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. आंदर मावळमधील टाकवे पुलावरून पाणी गेल्यामुळे पुल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. कांब्रे, बोरवली, डाहुली, चिरखानी, कुसुर , खांडी, सावळा, माळेगांव आदी गावांमधील असणारे ओढे यामुळे रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी आले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ठिकठिकाणी जाऊन पावसाच्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्यामुळे आपत्कालिन व्यवस्था कार्यरत झालेली आहे.

 

आंदर मावळमधील टाकवे पुलावरून पाणी गेल्यामुळे पुल बंद करण्यात आला आहे. तर धामणे गावचा पुल, कामशेत येथील नाणे पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. कांब्रे, बोरवली, डाहुली, चिरखानी, कुसुर, खांडी, सावळा, माळेगांव आदी गावांलगत असणारे ओढे यांमुळे रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी आले आहे.

कामशेतमधील इंद्रायणी कॉलनीतील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. कुसगाव खुर्द गावात विजेचे खांब कोसळलेले आहेत. गावात लाईट गेल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरामध्ये पाणी शिरले आहे. राजमाची, उधेवाडी ह्या भागात काही ठिकाणी दगड मातीच्या रस्त्यांमुळे उन्हाळ्यात प्रवास करणे कठीणच आहे. तर पावसाळ्यात रस्त्यावर माती आल्याने चिखल आला आहे. रस्त्यात झाडे कोसळली आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *