महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । जीवनात आपले प्रथम गुरू म्हणजे आई वडील अगदी बोलणे,चालने, ते कसे वागणे शिकण्याची सुरूवात आई वडिलांपासूनच होते…..तसेच घरातील मोठे भाऊ व बहीणींचेही अमूल्य अस मार्गदर्शन मिळत असते तर आजी आजोबा सहीत नातेवाईक कुटुंबातील सर्व च वडीलधारी मंडळी कळत न कळत आपल्याला जीवनाविषयी सल्ले देत असतात……पुढे शाळेच्या माध्यमातून शिक्षक रुपी गुरू आपल्याला लाभत असतात ज्यांच्यापासून मिळालेले ज्ञान आपल्याला सामाजिक – व्यवहारीक व नोकरी-व्यवसायासाठी अतीशय उपयुक्त असते.ह्या सर्व सन्माननीय गुरूवर्यांबरोबर अजून एक गुरू आपल्या जिवणात असतो ज्या मुळे आपला आत्मविश्वास दृढ होत असतो….ज्या मुळे आपल्याला इतिहास कळतो….वर्तमान समजतो व भविष्य घडवण्यात कामी पडतो…तो गुरु म्हणजे “पुस्तक”……
आजच्या सोशल मिडीया च्या युगात लिखाण व वाचन दोन्ही झाले आहेत…..माझ्या अनुभवानुसार पुस्तकातून जे आपल्या ध्यानी मनी फिट्ट बसते ते सोशल मिडीयातून नाही बसत….पुढचे वाचले की मागचे विसरायला होते…..म्हणून पुस्तकांचे महत्व पुस्तकांची गरीमा हि कधीही कमी न होणारी आहे…..शेकडो..हजारो वर्षांच्या ग्रंथ..कथा पुस्तकांमध्ये असलेले आपले वडीलधारी मंडळी च्या डोक्यात आहे पुर्वी तर शिक्षण सर्वांना भेटत नव्हते तर काहीना शिक्षण घेण शक्य नव्हत आता तर पूर्वजांच्या पुण्याईने आपणास शिक्षण उपलब्ध आहे…आपल्या ला लिहता वाचता येते….म्हणून लिहले आणि वाचले पाहीजे…पुस्तकी ज्ञानातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते जे जिवणाच्या प्रतेक वळणावर कामी पुस्तक कोणतेही असो…. ऐतिहासिक असो की कथा, नाटक,काव्य धर्म, ग्रंथ असो की व्यवसायीक असो कोणत्याही विषयावर असो ते आपल्याला काहीना काही नक्किच शिकवत असते….म्हणून पुस्तके लिहणारे लेखक-कवी हे आपले गुरु च आहेत….म्हणून आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त त्याना शतशः वंदन…पि.के.महाजन.