Samsung Galaxy A22 5G लॉन्च, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A22 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

ग्रे, व्हायलेट आणि मिंट अशा तीन रंगामध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फोनची विक्री 25 जुलैपासून सुरु होणार आहे. सॅमसंगच्या वेबसाईटसह अन्य रिटेल प्लॅटफॉर्मवरूनही तुम्ही या स्मार्टफोनची खरेदी करू शकता.

किंमत
– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.
– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 21 हजार 999 रुपये आहे.

कॅशबॅक ऑफर
कंपनीने या स्मार्टफोनसोबत लॉन्चिंग ऑफरही दिली आहे. याद्वारे ग्राहक 1 हजार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. यासाठी ग्राहकाकडे एचडीएफची बँकेचे कार्ड असणे आवश्यक आहे.

फीचर्स
– 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी व्ही डिस्प्ले
– तीन रिअर कॅमेरा सेटअप
– प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
– सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– यूएसबी, मायक्रो एसडी सपोर्ट, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 5 जी सारखे फीचर्स

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *