इलेक्ट्रीक वाहनांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय आहे नवा नियम?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या दुचाकी व कारचालकांसाठी आता चांगली बातमी आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणाला आज मान्यता दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कार विकत घेणाऱयाला दीड लाख रुपयांची तर ई स्कूटर-बाईकच्या खरेदीवर दहा हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र सुरुवातीलाच बुकिंग करणाऱयांना ही ऑफर मिळेल.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण आखले होते. आता राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021’ हे राबवण्यास शासन निर्णयाद्वारे आजपासून मान्यता दिली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हे धोरण राबवण्यात येईल. त्यात बॅटरीवर धावणाऱया दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीवर प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे. महागडय़ा इंधनावर पर्याय व वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी हे धोरण आखले आहे. बॅटरीवर धावणाऱया वाहनांसाठी कोणत्या योजना, चार्जिंग स्टेशनची संख्याही निश्चित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *