30 सप्टेंबरपर्यंत डेटा करा एक्सपोर्ट ; 16 वर्षं जुनं फीचर गुगल करणार बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । जगभरातील कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी गुगलचा वापर होतो. गुगल युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तब्बल 16 वर्षे जुनं गुगल बुकमार्प हे फीचर पंपनी आता बंद करण्याच्या तयारीत आहे. 30 सप्टेंबरपासून ही सेवा कायमस्वरूपी बंद होणार असल्याची अधिपृत घोषणा आज करण्यात आली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवर ही माहिती देण्यात आली आहे. हे फीचर बंद होणार असल्याने ज्या युझर्सनी आपल्या आवडत्या वेबसाईट्स बुकमार्क्सवर सेव्ह केल्या आहेत त्या युझर्सना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

गुगलने आपल्या सर्व युजरला बुकमार्क्समध्ये सेव्ह केलेले बुकमार्प, लिंक्स आणि नोट्स हा सर्व डेटा एक्सपोर्ट करायला सांगितला आहे. सप्टेंबरनंतर युजर आपला डेटा का@पी करू शकत नाहीत. डेटा एक्सपोर्ट करण्यासाठी ‘एक्सपोर्ट बुकमार्क्स’चा पर्याय उपलब्ध आहे. बुकमार्क्स बंद झाल्याने गुगल मॅप वापरण्यातदेखील अडचणी येऊ शकतात असे बोलले जात आहे. कारण हे फीचर बुकमार्क्सशी संबंधित आणि सिंक आहेत. गुगल बुकमार्क्स बंद झाल्यानंतर Starred लोकेशनदेखील डिलीट होणार किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *