पिंपरी चिंचवड : लशीच्या दुसरा डोस साठी चार लाख नागरिक प्रतीक्षेत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । कोरोना (corona) प्रतिबंधक लसीकरण (vaccine)जलदगतीने व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची (vaccine) गती मंदावली आहे. शिवाय आता मुदत संपूनही दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे सात लाख १० हजार ८६७ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. (Did not get a second dose of vaccine Four lakh citizens waiting)

त्या तुलनेत अवघ्या दोन लाख ४३ हजार ६६७ जणांनाच दुसरा डोस मिळाल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. म्हणजेच शहरात चार लाख लोक असे आहेत, की ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही, असे उघड झाले आहे. सध्या महापालिकेच्या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगट आणि ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे.

दुसरा डोस घ्यायला येताना केवळ पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि लाभार्थी म्हणून असलेली नोंदणी तपासली जाते. कोविन पोर्टलवरच लाभार्थ्यांची नोंदणी होत असल्याने आणि या पोर्टलचा कोणताही अॅक्सेस महापालिकेला नसल्याने लाभार्थ्यांना अनेकदा केंद्रावर लस उपलब्ध झालेली नाही. सध्या कोव्हॅक्सिनची लस पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डोससाठी उपलब्ध आहे. मात्र, अनेकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेला आहे; पण आता या लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळाला नाही. त्यामुळे मुदत उलटल्यानंतरही दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या वाढतेय.

लसीकरणाची स्‍थिती

पहिला डोस दुसरा डोस

२,९४,५३३ – ६,९३२ (१८ वर्षांवरील )

१,००,८१६ – २,०३,९०३ (४५ वर्षांवरील )

९०,३३३ – १,३५,६२७(६० वर्षांवरील )

२४,३८८ – ४४,७७३ (फ्रंटलाइन वर्कर)

२१,१९८ – ३२,०३१ (आरोग्य कर्मचारी)

२,४३,६६७ – ७,१०,८६७ (एकूण लाभार्थी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *