महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । आज सलग नवव्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. म्हणजेच, आजही देशभरातील सर्वच शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरांत 30 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
मुंबई शहरामध्ये जिथे पेट्रोलची किंमत 29 मे रोजी पहिल्यांदा 100 रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. अशातच आज पेट्रोलची किमत 107.83 रुपये प्रति लिटर आहे. शहरामध्ये डिझेलच्या किमतीही 97.45 रुपये आहे. जी देशातील प्रमुख शहरांमधील सर्वाधिक किंमत आहे. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती आतापर्यंत 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
शहरं पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत
दिल्ली 101.84 89.87
मुंबई 107.83 97.45
चेन्नई 102.49 94.39
कोलकाता 102.08 93.02
बंगळुरु 105.25 95.26