Income Tax | ITR फाइल करण्याची शेवटची डेडलाइन वाढली;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. परंतु डेडलाइन वाढवल्याने दंडात्मक व्याज शुल्क भरावेच लागणार आहे.

इनकम टॅक्स एक्ट 1961 चे सेक्शन 234A, 234B, 234C च्या अंतर्गत करदात्यांना टॅक्सवर व्याज देणे गरजेचे असते. जर त्याला इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास उशीर होत असेल. तर सेक्शन 234A अंतर्गत आयटीआर फायलिंग उशीरा भरल्यावर व्याज द्यावे लागते.
समजा, आयटीआर फाइल करण्याची तारीख 31 जुलै 2021 आहे. आणि तुम्ही 6 ऑगस्ट 2021 फाइल केले. या केसमध्ये करदात्याला 1 महिन्याचे म्हणजेच 1 टक्के व्याज लागेल. 6 दिवसांचा उशीर देखील पूर्ण एक महिन्याचा उशीर मानला जातो.

ज्या करदात्यांचे सेल्फ असेसमेंट टॅक्स 1 लाखापर्यंत आहे. त्यांना सेक्शन 234A अंतर्गत करदात्यांना दिलासा मिळतो. परंतु टॅक्स लायबिलिटी 1 लाखाहून अधिक असेल, तर करदात्याला उशीरा आयटीआर फाइल केल्यास दंड भरावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *