महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । इटालियन स्पोर्टस् कार बनवणारी कंपनी लंर्बोगिनी भारतात यावर्षी विक्रमी स्तरावर कार्सची विक्री करण्याचा टप्पा गाठू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने वर्ष 2019 मध्ये 52 कार्स विक्री करण्याचा विक्रम केला होता. तेव्हा यावर्षी हा विक्रम मोडीत काढला जाण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता विक्रीत हळुहळू वाढ होत आहे. लसीकरणाला आलेला वेग पाहता विक्रीत विक्रम साधणे शक्य होईल. 3.15 कोटी ते 6.33 कोटी रुपयांच्या कार्सची विक्रीची कामगिरी अधिक चांगली असेल.