चांगली बातमी ; या आठवड्यात PF खात्यात येईल अधिक रक्कम, असा तपासा बॅलेन्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । नोकरदार वर्गासाठी (Salaried Employees) केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाने व्याजदरांना मंजुरी दिल्यानंतर आता नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडाच्या (PF) खात्यात आठवड्यात जास्त रक्कम जमा होऊ शकणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज दर मंजूर केला आहे. अगदीच या आठवड्यात पीएफची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर नाही झाली तरीही आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 व्याज दरानुसार होणारी तुमच्या पीएफवरची जादाची रक्कम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात येऊ शकते.

नोकरदार व्यक्तीच्या भविष्याची तरतूद म्हणून त्याच्या पगारातून ठराविक रक्कम दरमहा कापून पीएफ खात्यात त्याची कंपनी भरत असते. तसंच तेवढीच रक्कम ती कंपनीही खात्यात जमा करत असते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ठरावीक रक्कम मिळू शकते. या पीएफमधील रकमेवर सरकार व्याज देतं. ते व्याज दर सरकारकडून जाहीर केले जातात.

केंद्रीय श्रम मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी 8.5 टक्के व्याज दर देणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या सात वर्षांतील हा सर्वांत कमी व्याज दर आहे. 2012-13 मध्ये सरकारने 8.5 टक्के व्याज दर (Interest Rate) दिला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात पीएफ सदस्यांच्या केवायसीसंबंधी बऱ्याच अनियमितता आढळल्याने व्याजाची रक्कम जमा होण्यास उशीर झाला होता. पण या वर्षी तसं होणार नाही वेळेत व्याजाची रक्कम जमा होऊ शकेल.

SMS करून जाणून घ्या PF खात्यातला बॅलेन्स –

जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ईपीएफओकडे रजिस्टर्ड असेल, तर तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्सची माहिती तुम्हाला एसएमएसवरही मिळू शकते. त्यासाठी 7738299899 या क्रमांकावर EPFOHO असा मेसेज पाठवा. जर तुम्हाला हिंदी माहिती हवी असले तर EPFOHO UAN लिहून त्याच क्रमांकावर मेसेज पाठवा. ही सेवा आता इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्येही उपलब्ध होऊ शकते. पीएफ बॅलेन्स जाणून घेण्यासाठी तुमचं युएएन अकाउंट, पॅन कार्ड नंबर (PAN) आधार (AADHAR) कार्डाशी लिंक असणं गरजेचं आहे.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या बॅलेन्स –

तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. मग ईपीएफओकडून मेसेजद्वारे तुम्हाला पीएफ बॅलेन्स कळवला जाईल. या सुविधेसाठीही तुमचं युएएन अकाउंट, पॅन कार्ड नंबर (PAN) आधार (AADHAR) कार्डाशी लिंक असणं गरजेचं आहे.

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना मिळू शकतं पेन्शन, जाणून घ्या EPFO नियम

पीएफचा बॅलेन्स ऑनलाइन असा तपासा –

– ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करा, epfindia.gov.in वर जाऊन ई-पासबुकवर क्लिक करा.

– ई-पासबुकवर क्लिक केल्यावर passbook.epfindia.gov.in पेज ओपन होईल.

– इथे यूजर नेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

– संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्ही नव्या पेजवर याल तिथं तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल.

– इथे ई-पासबुकवर तुमचा ईपीएफ बॅलेन्स तुम्हाला दिसेल.

तुमचं बँक अकाउंट Aadhaar नंबरने हॅक होऊ शकतं का? UIDAI ने दिलं उत्तर
Umang App –

– फोनमध्ये उमंग अप (Unified Mobile Application for New-age Governance) ओपन करा आणि ईपीएफओवर क्लिक करा.

– दुसऱ्या पेजवर एम्प्लॉई-सेंट्रिक सर्व्हिस (employee-centric services) वर क्लिक करा.

– इथे View Passbook वर क्लिक करा. यूएएन नंबर आणि पासवर्ड (ओटीपी) नंबर टाका. ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल. त्यानंतर तुम्हाला पीएफ बॅलेन्स तपासता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *