मराठी पाऊल पडते पुढे ; फलटणचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन भोसले यांचा नेल्सन मंडेला नोबल पिस अवॉर्ड ने सन्मान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै ।

पुणे येथे झालेल्या नेल्सन मंडेला नोबल पिस अवॉर्ड २०२१ या कार्यक्रमात फलटण चे सुपुत्र सचिन भोसले यांना बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी गौरवण्यात आले. उत्तम कार्यपद्धती व जनतेच्या सेवेमध्ये दाखविलेला उत्तम सहभाग ,यामुळे लोकांच्या जीवनाचा कायापालट करणारा नेल्सन मंडेला नोबल पिस अवॉर्ड २०२१ हा कार्यक्रम पुण्यात पार पडला .

या कार्यक्रमास देशभरातून नावाजलेले उद्योजक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील पारंगत व्यक्ती उपस्थित होत्या . या वेळी व्ही .एन . एस . ग्रुप चे मालक ,अष्टविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विडणी , तसेच महाराजा मल्टीस्टेट को. ऑप. संस्था , संचालक सचिन भोसले यांना रिअल इस्टेट क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल तसेच ग्रुप च्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे, नेल्सन मंडेला नोबल पिस अवॉर्ड अकॅडमी अमेरिका यांच्या तर्फे हा अवॉर्ड देण्यात आला . हिंदुस्थान चे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी व प्रा. मधू कृष्णन नेल्सन मंडेला अकॅडमी यांच्या हस्ते डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली .

”  फलटण तालुक्यातील विडणी गावच्या  सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेले , अपार कष्ट व जिद्दीच्या जोरावर वयाच्या १४ व्या वर्षी पासून सुरु झालेला हा प्रवास , फलटण ते मुंबई सलग ३ वर्षी रोज भाजीपाला विकणे . यातून व्यवसाय करण्याची जिद्द निर्माण झाली , नंतर गिरणी व्यवसाय , नर्सरी व्यवसाय , तसेच शिवजल सिटी सारखा १००० बंगल्यांचा भव्य प्रकल्प तो पण सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्यात असणाऱ्या किंमतीत , असे अनेक प्रॉजेक्ट व्ही .एन . एस ग्रुप कडून सुरू आहेत, ज्यात सामन्यातील सामान्य व्यक्तीला नजरेसमोर ठेऊन बनविले आहेत, बांधकाम क्षेत्रातील याच उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेत सचिन भोसले यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आले .”

सदर कार्यक्रमास उद्योगजगतासह बॉलीवूड मधील नावाजलेले गायक कुमार सानू , पार्श्व गायिका मिस. पलक मोची , ऍड उज्ज्वल निकम , हॉकी पटू धनराज पिल्ले , सुहास मंत्री . आदी मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *