Gold Price Today: सोनं चांदी च्या दरात तेजी , जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै ।

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत आहे. सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. वायदा बाजारात (Multi commodity Excahnge) सोन्याचा प्रतितोळा दर 90 रुपयांनी वाढून 47624 वर पोहोचला. तर चांदीच्या दरात 195 रुपयांची वाढ होऊन तो प्रतिकिलो 67219 रुपयांवर पोहोचला.

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 8576 रुपयांनी स्वस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी असून प्रतिऔंस सोन्याचा दर 1,807.23 डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे.

मात्र, सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

सोन्याचा रोजचा दर कसा जाणून घ्याल?
तुम्ही घरबसल्याही सोन्याचा रोजचा दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर सोन्याचा दर तुम्हाला कळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *