भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचा पुढाकार ; कॅन्सरवरील आयुर्वेदिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळण्याची चिन्हे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । कॅन्सरच्या उपचारात केमोथेरेपी आणि रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रता आयुर्वेदिक उपचार पद्धतीने कमी करणाऱ्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टने आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा आणि राष्ट्रीय स्तरावर दोन अशी आठ पेटंट सादर केली आहेत. त्यापैकी पाच पेटंट प्रकाशितही झाली आहेत. या पेटंटला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

केमोथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रवाळ पिष्टी तसेच सुवर्ण भस्म असणारे औषध, सुवर्णभस्मादि योग हे प्रतिकारशक्ती वाढवणारे, सूज कमी करण्यासाठीचे पद्मकादि धृत औषध, अनुवंशिक व जनुकीय संक्रमण झालेल्या स्तनाच्या कर्करुग्णांसाठीचे औषध, तोंडाच्या कर्करोगामध्ये रेडिएशनमुळे होणाऱया दुष्परिणामांची तीव्रता करणारे ट्रीपल निगेटिव्ह आदी औषधाचा औषधाचा पेटंटमध्ये समावेश आहे.

टाटा ट्रस्टचे अनुदान
केमोथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणाऱ्या आठपैकी दोन केमो रिकव्हरी किट्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अलीकडेच झाले आहे. हे किट्स सध्या रुग्णांसाठी वापरले जात आहे. आठ पेटंटसाठीच्या क्लिनिकल ट्रायल्स व प्रयोगशाळेतील तपासण्यांसाठी टाटा ट्रस्टने आर्थिक अनुदान दिले आहे.

पेटंट प्रकाशित होणे हा मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो. हिंदुस्थानात आयुर्वेदशास्त्र प्राचीन आहे. त्याचा उपयोग दुर्धर आजारावरील रुग्णांना होण्यासाठी हे संशोधन केले आहे.
डॉ. सदानंद सरदेशमुख, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *