बनावट संकेतस्थळ कशी ओळखणार? मुंबई पोलिसांनी दिले महत्त्वाचे पॉइंट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । अमक्या अमक्या लिंकवर क्लिक करा आणि वेबसाईटवरून मिळवा मोठी ऑफर, फ्री गिफ्ट. तुमच्यासाठी आहे हे खास डिस्काउंट अशा काही आकर्षक मेसेजवरून अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. बनावट वेबसाइटवरून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार महत्त्वाचे पॉइंट दिले आहेत. ज्यामुळे फसवणूक होऊन फटका बसण्यासापासून ग्राहकांचे रक्षण होईल. बनावट साईट ओळखणे हे अगदी सोप्पे आहे.

‘मुंबई पोलीस म्हणतात संकेतस्थळ बनावट असल्याचे हे काही चिन्ह (पॉइंट) आहेत. आकर्षक ‘ऑफर’ ला बळी न पडता संकेतस्थळ खरे असल्याची खात्री करा, आणि काही संशयास्पद आढळल्यास आम्हाला कळवा!’

अनेकदा मोठ्या ब्रँड्सच्या सारख्या दिसणाऱ्या किंवा स्पेलिंग मध्ये चटकन लक्षात येणारे असे बदल करून लोकांची मोठी फसवणूक होते. खरी साइट आणि बनावट वेबसाइट कशी ओळखायची असा प्रश्नही अनेकदा निर्माण होतो. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट ई-कॉमर्स वेबसाइटमध्ये पुढील चार गोष्टी किंवा यापैकी एखादी गोष्ट आढळत नाही.

1) रिफंड किंवा रिटर्न पॉलिसी किंवा त्याची कोणतीही माहिती अशा साइटवर नसते.

2) कस्टमर केअर क्रमांक नसतो

3) शंका निर्माण होती अशा ऑफर्स

4) आवश्यक नसताही अधिकची माहिती मागितलेली असते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *