खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार ‘एवढी’ सूट ; पालकांना मोठा दिलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च हा पालकांच्या समोर उभ्या राहणाऱ्या अडचणींपैकीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरत असतानाच आता पालकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खासगी शाळांच्या फी मध्ये कपात करण्यात येणार आहे.

खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा अध्यादेश काढण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याची माहिती समोर येत असून, यासंदर्बात शिक्षण विभागाकडून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चाही केली जाणार असल्याचं कळत आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने खाजगी शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत हा अध्यादेश काढला जाणार असून, फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे स्पष्ट होत आहे.

मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित आहे. महाधिवक्तांनी या अध्यादेशाला हिरवा कंदील दिला, तर याच आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत अध्यादेश मंजूरीसाठी आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *