Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे दर ‘स्थिर ‘; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । कालच्या घसरणीनंतर आज सोन्या-चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या किंमतीत अगदीच किरकोळ म्हणजे 10 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,850 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,850 रुपये इतका आहे. एक किलो चांदीसाठी आता 66,400 रुपये मोजावे लागणार आहेत.

बुधवारी सोन्याच्या दरात 180 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांचा विचार करता 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले. त्यानंतर 27 जुलैला पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *