31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवा ; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । देशात कोरोनाचा फैलाव अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जारी केलेले निर्बंध 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवा, पॉझिटीव्हीटी रेट जास्त असलेल्या जिह्यांमध्ये कडक पावले उचला, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्ये व पेंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. देशभर कोरोना पुन्हा वाढल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी हे निर्देश जारी केले.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत मधेच घट होत असली तरी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अजूनही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. टेस्ट, ट्रक, ट्रीटमेंट, लसीकरण आणि मार्गदर्शक तत्त्वे या पंचसूत्रीवर सातत्याने लक्ष ठेवलेच पाहिजे, विषाणूच्या पुनरुत्पादन घटकात कोणतीही वाढ होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. ऑक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होत असल्याने काही राज्यांनी अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *